‘‘उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे/जून २०१८’’

 

 

       

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी दोन्ही प्रशिक्षणासाठी गृहकार्य मूल्यमापना संदर्भात सूचना

i)    माहे मे /जून २०१८ मध्ये सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी प्रशिक्षणाचे प्रशिक्षणोत्तर  गृहकार्यातील स्व-मूल्यमापन (20 गुणांसाठी) व वर्गाध्यापनाचा व व्हिडियो (१० गुणांसाठी) Youtube वर upload करून त्याची URL (Weblink) Online अपलोड केलेली आहे. हे दोन्ही गृहकार्य आपणास मूल्यमापनासाठी देण्यात आलेले आहेत.

   

ii)     सर्व मार्गदर्शक तज्ञांनी http://training.mh-hsc.ac.in ह्या संकेतस्थळावर स्वत:चे login करताना आपले Division, आपण शिकवत असलेला विषय, मोबाईल नंबर व पासवर्ड च्या सहाय्याने संगणकावर ओपन करून त्याचे मूल्यमापन करावयाचे आहे.

     

iii)   आपणास देण्यात आलेल्या सर्व गृहकार्य तपासणीबाबत योग्य ती गोपनीयता पाळावयाची आहे. त्याची कोणतीही प्रिंट काढावयाची नाही तसेच ते कॉपी /सेव्ह करून ठेवावयाचे नाही. कुठेहि प्रसिद्ध करावयाचे नाही. सदर गृहकार्य संगणकाच्या स्क्रीनवर पाहून /वाचून मूल्यमापन करावयाचे आहे. विभागीय मंडळांनी दिलेल्या विहित कालावधीत तपासून गुणदान करावयाचे आहे.

   

    

iv)    प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या गृहकार्याचे मूल्यमापनाबाबत वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी “प्रचिती व अविष्कार” व निवड श्रेणीसाठी “चिंतन व प्रेरणा” या अध्यापक पुस्तिकांमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मूल्यमापन करावयाचे आहे, या पुस्तिकांमध्ये गृहकार्याच्या प्रक्राराप्रमाणे गुणदानासाठी निर्देश दिलेले आहेत, त्या आधारे मूल्यमापन करावयाचे आहे.


·       स्व- मूल्यमापन (२० गुणांसाठी): मंडळातर्फे स्व- मूल्यमापन कार्यासाठी http://training.mh-hsc.ac.in या प्रशिक्षणासाठी च्या वेबसाईटवर प्रश्नावल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्या भरून प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी आपले स्व-मूल्यमापन  कार्य सादर केलेले आहे, त्यात प्रत्येकी २ गुणांसाठी १० प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे प्रशिक्षणार्थ्यांनी प्रश्नाखाली दिलेल्या जागेत ऑनलाईन लिहिलेली आहेत ते आपणास मूल्यमापनासाठी देण्यात आलेले आहेत. उपलब्धतेनुसार प्रशिक्षणार्थी शिक्षकाने ऑनलाईन सादर केलेल्या स्व-मूल्यमापन प्रश्नावलीची प्रिंट व त्यासोबत प्रशिक्षणार्थ्यांनी दिलेल्या उत्तराची पुष्टी करणारे प्रशिक्षणार्थ्यांनी जोडलेले कागदपत्र/ आवश्यक ते पुरावे हार्डकॉपीच्या स्वरूपात जोडले असल्यास  त्यांचाही मूल्यमापन / गुणदान करताना विचार करावा. प्रशिक्षणार्थ्यांनी पुरावे जोडणे बंधनकारक नाही, कागदपत्र / आवश्यक ते पुरावे नसल्यास प्रशिक्षणार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तराच्या आशयाचा विचार करून गुणदान करावे.

 

 

·       दृकश्राव्य सादरीकरण (१० गुणांसाठी) : प्रशिक्षणार्थी शिक्षकांना किमान ३ मिनिटाचा (कमाल मर्यादा नाही) प्रत्यक्ष वर्गध्यापनाचा व्हिडियो रेकॉर्डींग करून तो Youtube वर Upload केलेला आहे व त्याची URL (Weblink) मंडळाच्या वेबसाईटवर नोंदविलेली आहे. सदर URL प्रशिक्षणार्थी निहाय आपणास मूल्यमापनासाठी देण्यात आलेल्या आहेत. या URL वर क्लिक केले असता नेट सुरु असलेल्या संगणकावर Youtube ओपन होऊन सदर URL चा व्हिडियो सुरु होईल. तो पाहून १० गुणातून गुणदान करावयाचे आहे. गुणदान करताना रेकॉर्डींग क्वालिटी, रेकॉर्डींगची पद्धत, वापरलेला कॅमेरा इत्यादी तांत्रिक गोष्टी विचारात घेऊ नयेत. विषय वर्गाध्यापनाची पद्धत इत्यादी गोष्टी विचारात घेऊन गुणदान करावे.

 

 

         उपरोक्त दोन्ही कार्यासाठी गुणदानाचे गुण नोंदविण्यासाठी संगणकावर ऑनलाईन दिलेल्या विहित जागेत अचुकपणे नोंदवावयाच्या आहेत.

                                                                                                                    
 
वरिष्ठवेतनश्रेणी तज्ज्ञ-मार्गदर्शकांनी येथे क्लिक करा . Click Here
निवडश्रेणी तज्ज्ञ-मार्गदर्शकांनी येथे क्लिक कराClick Here