s
 

‘‘उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे/जून २०१८’’

 

        गृहकार्य मूल्यमापनासंदर्भातील आवश्यक बाबी:-

1.    माहे मे/जून २०१८ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी प्रशिक्षणाचे प्रशिक्षणोत्तर पहिल्याटप्प्यातील गृहकार्य Online अपलोड केलेले आहे. 

 

2.   सर्व मार्गदर्शक तज्ज्ञांनी http://training.mh-hsc.ac.in ह्या संकेतस्थळावर स्वत:चे रजिस्ट्रेशन करतांना त्यांचे Username(आपला मोबाईल क्रमांक) Password वापरलेला आहे.  आपणास पाठविण्यात आलेले गृहकार्य याच Username Password च्या सहाय्याने संगणकावर Open करुन त्याचे मूल्यमापन करावयाचे आहे.

3.    प्रत्येक मार्गदर्शकाला साधारणत: ०१ ते १५ प्रशिक्षणार्थीचे पहिल्याटप्प्यात खालील प्रमाणे प्रशिक्षण निहाय गृहकार्य तपासावयाचे आहेत.आपणाकडे पाठविलेले गृहकार्य दि.३० सप्टेंबर २०१८ पर्यत पूर्ण करण्यात यावे.

        

         अ) निवडश्रेणीसाठी:- १) शोधनिबंध- ४० गुणांसाठी, २) सद्य अभ्यासक्रमाचा चिकित्सक अभ्यास- ४० गुणांसाठी या दोन्ही कार्यांचे ऑनलाईन मूल्यमापन करुन ऑनलाईन गुणनोंदणी करावयाची आहे.गुणदान करताना अध्यापक "चिंतन व प्रेरणा " मध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मूल्यमापन करावयाचे आहे ,या पुस्तिकेतील पृष्ठ क्र.vii वर गृहकार्याच्या प्रकाराप्रमाणे मुद्देनिहाय गुणदानासाठी निर्देश दिलेले आहेत. त्या आधारे मूल्यमापन करावयाचे आहे. 

    ब) वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी:- १) शोधनिबंध- ४० गुणांसाठी, २) संविधान तक्ता, नमुना प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका- ४० गुणांसाठी या दोन्ही कार्यांचे ऑनलाईन मूल्यमापन करुन ऑनलाईन गुणनोंदणी करावयाची आहे.गुणदान करताना अध्यापक " प्रचिती व आविष्कार " मध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मूल्यमापन करावयाचे आहे ,या पुस्तिकेतील पृष्ठ क्र.x वर गृहकार्याच्या प्रकाराप्रमाणे मुद्देनिहाय गुणदानासाठी निर्देश दिलेले आहेत. त्या आधारे मूल्यमापन करावयाचे आहे.

            

4.    प्रत्येक मार्गदर्शकाने स्वत:च्या अथवा महाविद्यालयाच्या संगणकावर वरिल संकेतस्थळावर Login करुन आपणास मूल्यमापन करण्याकरिता पाठविण्यात आलेल्या गृहकार्याला डाऊनलोड करावयाचे आहे.  एकावेळी फक्त एका प्रशिक्षणार्थीचे गृहकार्य डाऊनलोड करता येईल.  यामध्ये मुद्दा क्र.२ ‘अ’ किंवा ‘ब’ मध्ये दिल्याप्रमाणे दोन PDF Files असतील.  त्यांचे वाचन करुन मूल्यमापन करावयाचे आहे. केलेल्या मूल्यमापनाचे गुण नोंदविण्यासाठी उपरोक्त संकेतस्थळावर व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे तेथे विहित जागी गुणदान करावयाचे आहे.   त्या नंतर नवीन प्रशिक्षणार्थीचे गृहकार्य डाऊनलोड करुन त्याचेही याच पध्दतीने मूल्यमापन व गुणदान करावयाचे आहे.  या प्रमाणे आपणास पाठविलेल्या सर्व गृहकार्याचे मूल्यमापन व गुणदान एका नंतर एक अशा पध्दतीने करावयाचे आहे.

                                                                                    

5.    शोधनिबंध कार्यामधे A B असे दोन भाग आहेत.  A भागात- (i)प्रतिज्ञापत्र (ii)मार्गदर्शकांचे प्रमाणपत्र (iii)प्राचार्यांचे प्रमाणपत्र (iv)ऋणनिर्देश व B भागात शोधनिबंधाचे नावाला गुण नाहित. संपूर्ण कमाल ४० गूण हे शोधनिबंधासाठी आहेत. आणि ४० गूण निवडश्रेणीसाठी सद्य अभ्यासक्रमाचा चिकित्सक अभ्यास व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ४० गुण संविधान तक्ता, नमुना प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका असे प्रशिक्षण निहाय प्रत्येकी ४०+४० (८०) गुणांतून मूल्यमापनानुसार गुणदान करावयाचे आहे.

6.  आपणास Online प्राप्त झालेले गृहकार्य याची कोणतीही प्रिंट काढावयाची नाही तसेच ते कॉपी/सेव्ह करुन ठेवावयाचे नाही.  सदर गृहकार्य संगणकाच्या स्क्रीनवर पाहून/वाचून मूल्यमापन करावयाचे आहे.  गृहकार्य प्राप्त झाल्यापासून आठ दिवसाच्या आत ते तपासून पुर्ण करावयाचे आहे.

7.  आपणास पाठविण्यात आलेले गृहकार्य तपासून पूर्ण झाल्यावर hodpapue.stateboard@gmail.com या इमेलवर वर गृहकार्य तपासणी पूर्ण झाल्याचा मेसेज आपल्या नोंदणीकृत email ID वरुन तात्काळ पाठवून मंडळास कळविण्यात यावे.  गृहकार्य दिलेल्या मुदतीतच तपासून पूर्ण करावे.

   8. मूल्यमापनासाठी अध्यापक पुस्तिकेत व मूल्यमापन तक्त्यात तसेच मुद्दा क्र.२ मध्ये दिलेल्या कमाल गुणांना अनुसरुन गुणदान करावयाचे आहे. 

   9. उर्वरित दुस-या टप्प्यातील गृहकार्य- अध्यापणाचा Video प्रशिक्षणार्थ्यांनी YouTube वर अपलोड करावयाचा आहे.या अपलोड केलेल्या Video ची Link  यापूर्वी प्रमाणे              http://training.mh-hsc.ac.in वर (Upload) नोंदवावयाची आहे
                                                           
 
 
वरिष्ठवेतनश्रेणी तज्ज्ञ-मार्गदर्शकांनी येथे क्लिक करा . Click Here
      निवडश्रेणी तज्ज्ञ-मार्गदर्शकांनी येथे क्लिक कराClick Here