‘‘उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे/जून २०१८’’

प्रशिक्षणार्थ्यांचे गृहकार्य Online पद्धतीने सादरीकरणा बाबतच्या सूचना:

 

        गृहकार्य सादरीकरणासाठी आवश्यक बाबी:-

i)    माहे मे/जून २०१८ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी वेबसाईट* http://training.mh-hsc.ac.in वर Online नावनोंदणी करण्यासाठी आपले प्रोफाईल तयार केले असल्यास त्या प्रोफाईलमध्ये प्रशिक्षण काळात किंवा प्रशिक्षणोत्तर काळात प्रशिक्षण घेतलेल्या केंद्राचे नाव नोंदवून ते अद्यायावत (update) केलेले असेलच, केले नसल्यास ते तात्काळ अद्यायावत करावे.

ii)     आपल्या Online प्रोफाईल मध्ये आपण नोंदविलेला भ्रमणध्वनी (Mobile) क्रमांक हा आपले User Name आहे.

     

iii)   आपण Online सादर करणार असलेल्या गृहकार्य BarahaIME किंवा Google Input Marathi मध्ये Fontsize 12 मध्ये सादर करावयाचे आहे.  यामध्ये सादर करणे शक्य होत नसल्यास आपल्याला येत असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये टाईप करुन साधारणत: Fontsize 16 किंवा 18 मध्ये  ते PDF करुन मगच Online Upload करावे.    

    

iv)    गृहकार्यातील वेगवेगळे भाग एकच वेळी किंवा वेगवेगळे सादर करता येतील. संपूर्ण गृहकार्य सादर झाल्यावर गृहकार्य विहित मुदतीत सादर केले असल्याबाबत आपणास एक संदेश येईल. गृहकार्य अपलोड केल्यानंतर त्यांची प्रिंट मिळणार नाही.


                                                                                                 Online सादर करावयाचे गृहकार्य व निर्धारित कालावधी

                                                           
प्रशिक्षण गृहकार्य कालावधी

निवडश्रेणी

प्रशिक्षण

१) शोधनिबंध

२) सध्य अभ्यासक्रम व मूल्यमापनाचा चिकित्सक अभ्यास, अपेक्षा व सूचना

१६ जुलै २०१८ ते

      ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत.
३) वर्गाध्यपनाचा व्हिडीओ                    ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत. 

४) स्व-मूल्यमापन

५) प्राचार्यांमार्फत मूल्यमापन

    ०१ ऑक्टोबर २०१८ ते

                 १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत

वरिष्ठ वेतनश्रेणी

प्रशिक्षण

१) शोधनिबंध

                                        १६ जुलै २०१८ ते 

                ३१ जुलै २०१८ पर्यंत.
२) संविधान तक्ता, नमुणा प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका
३) वर्गाध्यपनाचा व्हिडीओ                    ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत.  

४) स्व-मूल्यमापन

०१ ऑक्टोबर २०१८ ते

                १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत.
) प्राचार्यांमार्फत मूल्यमापन
 

१) शोधनिबंधः प्रशिक्षणानंतरच्या काळातील कार्यामधील शोधनिबंध(४० गुणांसाठी) तयार करुन तो मंडळाच्या उपरोक्त वेबसाईट वरील ड्रापबॉक्स मध्ये PDF स्वरुपात Upload करावयाचा आहे.  शोधनिबंध सादरिकरणाचे वेबपृष्ठ उघडले असता A B असे दोन भाग दिसतील. A भागात- (i)शोधनिबंधाचे नाव (ii)प्रशिक्षणार्थ्याचे नाव (iii)कार्यरत क.महाविद्यालयाचे नाव (iv) मार्गदर्शकांचे नाव व (v)प्रशिक्षण केंद्राचे नाव नमुद करावे व B भागात- आपण केलेला शोधनिबंध Upload करावा. या शोधनिबंधावर आपली ओळख दर्शविणारी कोणतीही गोष्ट नमुद करु नये. शोधनिबंधाबाबत सादर करावयाची प्रमाणपत्र : १) प्रतिज्ञापत्र २) मार्गदर्शकांचे प्रमाणपत्र ३) प्राचार्यांचे प्रमाणपत्र ४) ऋणनिर्देश   (वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी दोन्ही प्रशिक्षणांसाठी)

 

२) संविधान तक्ता, नमुना प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका(४० गुणांसाठी) तयार करुन ते प्रशिक्षणार्थ्यांनी मंडळाच्या वेबसाईट वरील ड्रापबॉक्स मध्ये PDF स्वरूपात Upload करावयाचा आहे. (फक्त वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणांसाठी)

                                                                                                                    

३) सद्य(प्रचलित) अभ्यासक्रम व मूल्यमापनाचा चिकीत्सक अभ्यास, अपेक्षा व सूचना अहवाल (४० गुणांसाठी) तयार करुन तो मंडळाच्या वेबसाईट वरील ड्रापबॉक्स मध्ये PDF स्वरुपात Upload करावयाचा आहे. (फक्त निवडश्रेणी प्रशिक्षणांसाठी)

४) स्व-मूल्यमापनः मंडळातर्फे स्व-मूल्यमापन तक्ता(२० गुणांसाठी) ऑनलाईन पद्धतीने उपरोक्त वेबसाईटवर उपलब्ध होईल. त्यात प्रत्येकी दोन गुणांसाठी १० प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे आपण त्याखाली दिलेल्या जागेत ऑनलाईन नोंदवावयाची आहेत. सदर मूल्यमापन विहित मुदतीत ऑनलाईन भरण्यात यावे व त्याची प्रिंट घेऊन आपल्या क.महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या सही शिक्यानिशी त्याची हार्डकॉपी विभागीय मंडळामध्ये जमा करावयाची आहे. 

      स्वयंमूल्यमापनाच्या पृष्ठावर विहित स्थळी आपल्या क.महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा मोबाईल क्रमांक नोंदवावयाचा आहे, या प्राचार्यांच्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठविला जाईल तो उपरोक्त वेबसाईटवर नोंदवून प्राचार्यांना त्यांचे मार्फत होणारे मूल्यमापन करता येईल.  (वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी दोन्ही प्रशिक्षणांसाठी)

५) प्राचार्यांमार्फत मूल्यमापनः मंडळातर्फे प्रशिक्षणार्थी मूल्यमापन तक्ता(१० गुणांसाठी) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल. त्यात प्रत्येकी दोन गुणांसाठी ५ प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे आपल्या क.महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत प्रश्नांखाली दिलेल्या पर्यायावर योग्य ते चिन्ह करुन ऑनलाईन नोंदवावयाची आहेत. सदर माहिती विहित मुदतीत ऑनलाईन भरण्यात यावी.  (वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी दोन्ही प्रशिक्षणांसाठी)

६)दृकश्राव्य सादरीकरण: किमान ३ मिनिटाचे प्रत्यक्ष वर्गाध्यापनाचा व्हिडिओ रेकॉर्डींग (१० गुणांसाठी) करुन तो Youtube वर विहित मुदतीत Upalod करावयाचा आहे व त्याची URL (Weblink) उपरोक्त वेबसाईटवर नोंदवावयाची आहे.  (वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी दोन्ही प्रशिक्षणांसाठी)

टिप:- सेवांतर्गत प्रशिक्षणातील तज्ज्ञांसाठी, प्रशिक्षणार्थ्यांच्या गृहकार्याचे मूल्यमापन करण्याबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

 
गृहकार्य देण्यास आपण तयार असल्यास येथे क्लिक करा.Click Here